| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 26th, 2020

  उत्तर नागपूर युवक काँग्रेसतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्त्कार

  नागपूर : राहुल गांधी यांच्या जन्मदिवस सप्ताहानिमित्त शहरातील पोलिस कर्मचारी, मनपा कर्मचारी, डॉक्टरर्स, नर्स, सफाई कर्मचारी आदी कोरोना योद्ध्यांचा उत्तर नागपूर युवक काँग्रेसतर्फे प्रमाणपत्र देऊन सत्त्कार करण्यात आला.

  नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज लोणारे यांच्या मार्गदर्शनात तसेच उत्तर नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष अनमोल लोणारे यांच्या नेतृत्वात सदर सत्त्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान जरीपटका पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, सुगतनगर पोलिस चौकीचे कर्मचारी एपीआय विजय बादोले, मनोज गाडगे, विनोद मेश्राम, अविनाश ग्वालबंशी, रामचंद्र गजभिये तसेच आसिनगर झोनचे स्वच्छता निरीक्षक मुन्नालाल ग्वालबंशी यांच्यासह अनेक कोरोना योद्ध्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

  यावेळी अहिंसक (बादल)वाहने, सामाजिक कार्यकर्ता सुमीत चव्हाण, हर्षल पाल, आशीष सार्वे, जीवक मेश्राम, मन गजभिये, रक्षक गजभिये, रुषाण करने, अनिकेत गायकवाड, गुलशन लांजेवार आदी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145