Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 26th, 2020

  हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतींना राज्यपालांचे अभिवादन

  भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबददल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

  महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय लष्कराचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावीत असताना वीरमरण प्राप्त झाल्याचे समजून अतिशय दु:ख झाले. हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळव‍ितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145