Published On : Mon, Aug 17th, 2020

जे.एन हॉस्पिटल मे रुग्णांशी गैर सोय

Advertisement

#वेकोली के वरिष्ठ अधिकारी का अक्षयमय दुर्लक्ष

कन्हान : वेकोलच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांसाठी कोरोना वार्ड सुरू करण्यात आले आहे. नेहरू हॉस्पिटलमध्ये वेकोलीचे कर्मचाऱ्यांना कोरोना महामारी विषयी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता वेकोली कर्मचाऱ्यांची ड्युटी तिथे लाविण्यात येत आहे.

त्या मुडे वेकोलीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना होण्याची डात शक्यता नाकारता येत नाही. ऑक्सिजन सिलेंडर ची ही पुरे पूर व्यवस्था नाही अश्या विकट परिस्थीतीत एरिया मेडिकल ओफिसर डॉक्टर खुशी मोईत्रा यांनी आठवड्या भरा पूर्वीच नाम मात्र पाहणी केली. या कडे वेकोली वरिष्ट अधिकाऱ्यांचे जाणून दुर्लक्ष केल्या जात आहे का असा प्रश्न नागरिकांना होत आहे.

जिल्हा प्रशिक्षनातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली परंतु हाल जैसे थे आहेत. क्षेत्रातील जनतेचे प्रमुख्याने लक्ष नेहरू हॉस्पिटल वर आहे. तरी नेहरू हॉस्पिटलमध्ये बेड वाढविने, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, वार्डात स्वच्छतावर लक्ष देण्यात यावे, पिण्याच्या पाणीची सोय नाही, अस्वच्छता, सारख्या अनेक समस्यांपासून येथे कवॉरंटाईन असणाऱ्या रूग्णांना जाहाव्हे लागत आहे. इतकच नव्हे तर डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी करिता पीपीई किट चा अभाव असल्याने रुग्णाशी नको तसा व्यवहार सुरू असल्याने नातेवाईक चिंता व्यक्त करीत असून या संदर्भात सि.एम.डी आर.आर.मिश्रा यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी केली आहे.