Published On : Thu, Mar 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या 9 विशेष समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल

Advertisement

नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या 9 विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे आज (ता. 5) स्वीकारण्यात आली. मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी ही नामनिर्देशनपत्रे स्वीकारली.

मनपाच्या स्थापत्य, प्रकल्प, वैद्यकीय सेवा व आरोग्य, विधि, शिक्षण, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी, क्रीडा, महिला व बालकल्याण, जलप्रदाय, कर आकारणी व कर संकलन या विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक शुक्रवार ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. त्याकरिता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. मात्र, अग्निशमन व विद्युत विशेष समित्यांसाठी सभापती आणि उपसभापती पदाकरिता उमेदवारांचे अर्ज आले नाहीत.

Gold Rate
Mar 5th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,62,100/-
Gold 22 KT ₹ 1,50,800 /-
Silver/Kg ₹ 2,70,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उमेदवारांची अंतिम यादी मनपा निगम कार्यालयातर्फे प्रकाशित करण्यात येईल. संबंधित समित्यांच्या सभापतींची निवडणूक सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या वेळेत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडेल. विशेष समितीच्या सभापती आणि उपसभापतीकरिता आलेले अर्ज…

स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती

सभापती – श्रीमती अश्विनी जयंत जिचकार – भाजप

उपसभापती- श्री. प्रदीप वसंतराव पोहाणे – भाजप

वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती

सभापती – श्रीमती मनीषा अतकरे – भाजप

उपसभापती- श्री. श्रीकांत आगलावे – भाजप

विधी विशेष समिती

सभापती- कु. निधी नितीन तेलगोटे – भाजप

उपसभापती-ॲड. संजयकुमार बालपांडे – भाजप

शिक्षण विशेष समिती

सभापती श्रीमती संतोषदेवी दीपक लढ्ढा – भाजप

उपसभापती श्रीमती भारती विकास बुंदे – भाजप

गलिच्छ वस्ती निर्मुलन व घरबांधणी विशेष समिती

सभापती- श्रीमती रुतिका मसराम – भाजप

उपसभापती- श्री. संदीप गवई – भाजप

क्रीडा विशेष समिती

सभापती श्रीमती दर्शनी धवड- भाजप

उपसभापती श्री. संजय चावरे – भाजप

महिला व बालकल्याण विशेष समिती

सभापती श्रीमती सारिका सुनील नांदूरकर – भाजप

उपसभापती – श्रीमती तारा (लक्ष्मी) ओमप्रकाश यादव – भाजप

जलप्रदाय विशेष समिती

सभापती श्रीमती दिव्या दीपक धुरडे – भाजप

उपसभापती श्री. विजय शंकरराव झलके – भाजप

कर आकारणी व कर संकलन विशेष समिती

सभापती- श्रीमती सरिता ईश्वर कावरे – भाजप

उपसभापती श्री सुनिल हिरणवार– भाजप

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement