सीताबर्डी, रामदासपेठ, धंतोली भागातील पाणीपुरवठा राहणार बाधित…
शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा बंद राहणार..
नागपूर: : धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या राज भवन जलकुंभ ते सीताबर्डी मुख्य जलवाहिनी वर संविधान चौक (पिंटू सावजी समोर) फ्लोव मीटर लावण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ह्यांनी संयुक्तपणे २४ तासांचे शटडाऊन- राज भवन जलकुंभ ते सीताबर्डी मुख्य जलवाहिनी वर मार्च ७ (सोमवार ) सकाळी १० ते मार्च ८ सकाळी १० वाजेपर्यंत घेण्याचे ठरविले आहे .
या कामांमुळे राज भवन जलकुंभ ते सीताबर्डी मुख्य जलवाहिनी पाणीपुरवठा सोमवारी (मार्च ७) पासून २४ तास पूर्णपणे बाधित राहणार आहे . ह्या कालावधी दरम्यान टँकरद्वारेही
पाणीपुरवठा होऊ शकणार नाही तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर त्या परिसरातील पाणीपुरवठा वेळेनुसार बाधित भागामध्ये पाणी पुरवठा पूर्ववत होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग
राज भवन जलकुंभ ते सीताबर्डी मुख्य जलवाहिनी : वसंतराव नाईक समाजकार्य महाविद्यालय (मॉरिस कॉलेज) , झिरो मैल मेट्रो रेल्वे स्टेशन परिसर, टेकडी लीने, सोनी गल्ली, टेम्पल बाजार रोड , आलू गल्ली, कलर लाईन, मयत वली गल्ली , कीर्तन गल्ली, सीताबर्डी मार्केट परिसर, मोदी नंबर १, २, ३, हनुमान गल्ली, सोमवार बाजार रोड, पायदानवाला लीने, गवळीपुरा, हनुमान वाटिका, , रात्र निवार गल्ली, महाजन मार्केट, महाराजबाग रॉड, तेलीपुरा, लता मंगेशकर हॉस्पिटल, पकोडेवाली गल्ली, इलेक्ट्रॉनिक मार्केट, तेलीपुरा, संगम चाळ , कुंभार टोली, नानजीभाई टाऊन, नॉर्मल स्कूल, छोटी धंतोली, रामदासपेठ, यशवंत स्टेडियम , मुंजे चौक परिसर आणि नेताजी मार्केट परिसर
ह्या २४ तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.
अधिक माहितीकरिता किंवा कुठल्याही तक्रारींकरिता नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ला १८०० २६६ ९८९९ वर संपर्क करावा