Published On : Mon, Apr 5th, 2021

एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री

Advertisement

खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट

नागपूर: विदयुत क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर आहेत.कोरोना काळात विदयुत विभागाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये .सर्वानी लसीकरण करून आपले व समाजाचे कोविडपासून रक्षण करावे ,असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले.

खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांनी आज भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कालपर्यत 4 लाख 62 हजार जणांना लस देण्यात आली. तर नागपूरात आतापर्यंत 4 लाख 69 हजार 311 नागरीकांनी लस घेतली.एका दिवसातील लसीकरणाचे हे उच्चांकी उददीष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लसीकरण मोहिमेमध्ये विशेष लक्ष घालून आहेत. विद्युत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आपल्या कार्यालयातील लसीकरणाबाबत पुढाकार घ्यावा. सर्व संबंधित विभागाची संपर्क ठेवून सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल याची खातरजमा करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

खापरखेडा येथील लसीकरण केंद्राची पाहणी त्यांनी केली.त्यामध्ये लसीकरणाची नोंदणी ,कोरोना टेस्टिंग कक्ष,लसीकरण कक्ष,याची पाहणी केली.लसीकरण केंद्रावर शारीरिक अंतर लक्षपूर्वक ठेवण्यात यावे ,अशी सूचना त्यांनी आवर्जून केली. यावेळी मुख्य अंभियंता राजू घुगे यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली. खापर खेडा केंद्रात साधारण 2000 कंत्राटी कामगार व 1200 अधिकारी कर्मचारी आहेत.त्या सगळ्यांना लसीकरण करण्यात येणार अशी माहिती श्री.घुगे यांनी दिली. वैदयकीय अधिक्षक डॉ.अमित ग्वालबंशी उपस्थित होते.

खापरखेडा लसीकरण केंद्रा नंतर कोराडी विदयुत विहार कॉलनीतील लसीकरण कक्षाचे उदघाटन त्यांनी केले.यावेळी कोराडी औष्णीक विदयुत केंद्र मुख्य अंभियंता राजेश पाटील आणि राजकुमार तासकर व वैदयकीय अधिक्षक डॉ.मुकेश गजभिये उपस्थित होते.यावेळी या केंद्रावरील लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची डॉ.राऊत यांनी विचारपूस केली. लसीकरण सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

कालच्या राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन ‘ नविन निर्बंधानुसार कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध झाला पाहीजे .रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत पुर्णतः बंद राहणार आहेत. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदीचे आदेश नागरीकांनी पाळावेत असे श्री.राऊत यांनी सांगीतले.

कोरोनाचा लढा लसीकरणाव्दारेच लढण्याचा सर्वानी सामुहीक प्रयत्न करावेत.मास्क्,शारीरीक अंतर सॅनीटायजर या त्रिसुत्रीचा वापर नियमीतपणे करण्याचे आवाहनही त्यांनी केले.