Published On : Fri, May 3rd, 2019

पिण्याच्या पाण्या करिता मुख्याधिकारी गावंडे ना घेराव

कन्हान: नगरपरिषद अंतर्गत प्रभाग १,२ व ३, ४ मधील नागरिकांना पिण्याचे पाणी नियमित न मिळता चार पाच दिवसा आड मिळत असल्याने नागरिकां ना पाण्याकरिता भयंकर त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची समस्या सोडविण्या करिता नगरपरिषद मुख्याधिकारी गावंडे याचा घेराव करून तक्रारीचे समाधान करण्याची मागणी करण्यात आली .

नगरपरिषद कन्हान पिपरी येथील प्रभाग ३ व ४ च्या पिपरी , पटेल नगर, अशोक नगर, विवेकानंद नगर, शिवाजी नगर येथील नागरिकांना मागील काही दिवस पासुन पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या भागात नगरपरिषद च्या टँकर ने पाणी पुरवठा करण्यात येत आहे . प्रभाग १ व २ मध्ये ४ ते ५ दिवसा पासून नाका न.७, गजभिये ले आउट, इंदिरा नगर, शिव नगर, राधाकृष्ण नगर, तुकाराम नगर, हनुमान नगर, गणेश नगर , राम नगर, गुरफडे ले आउट येथे पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने न.प. विरोधी पक्षनेता नरेशजी बर्वे यांनी मुख्याधिकारी सतीश गावंडे यांना अनियमितता बाबत विचारणा केली असता मुख्याधिकारीनी सकारात्मक उत्तर दिले नसता नरेशजी बर्वे यांनी नागरिकासह घेराव करून पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. असता गावंडे यांनी ४ ते ५ दिवसा त उपाययोजना होईल असे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने नगरसेवक गणेश भोंगाडे, बाबू रंगारी , स्वप्नील मते, शरद वाटकर , संजय शेंदरे , मनीष भिवंगडे, बाळा मेश्राम ,संजय कोलते सह प्रभाग १ व २ येथील नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टँकर लावुन व्यवस्था करण्यात आली — मुख्याधिकारी गांवडे

नगरपरिषद अंतर्गत विहीरीचा पाणाचे स्त्रोत वाढविण्या करिता उपसा सुरू असल्याने पाणी पुरवठा कमी झाल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. १ मे ला सायंकाळीच चारही प्रभात प्रत्येकी एक म्हणजे दोन नगरपरिषद व दोन खाजगी अशी चार टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement