Published On : Fri, May 3rd, 2019

केसीसी च्या पोकलेंड मशीनने दुकाने श्रतीगस्त, तीन तास विधृत खंडीत

कन्हान: चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण करण्या-या केसीसी बिल्डकॉन कंपनी च्या निष्काळजी पणाने पोकलेंड मशीनने झाड खोदुन काढताना दोन दुकाने क्षतीगस्त आणि ११ के व्ही ची भुमिगत केबल तोडल्याने कन्हानची भर उन्हात तीन तास विधृत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासीयाना भयंकर त्रास सहन करावा लागला. यामुळे केसीसी कंपनी वर कार्यवाही करण्यात करिता कन्हान पोलीस स्टेशनला निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

केसीसी बिल्डकॉन कंपनीच्या निष्काळजीपणा व मनमानी कारभाराने बुधवार (दि.१) ला दुपारी१ वाजता गांधी चौक कन्हान येथे नाली बांधकामाकरिता मोठे झाड खोदुन काढताना पोकलँड मशीन च्या बकेटने राजु पचकलसिया चाय नास्ता दुकान व अजय चौव्हान यांचे दुकान श्रतीगस्त झाले आणि लोकांनी मशीन थाबविण्यास सागुन सुध्दा मशीन चालकाने न ऐकता ११ के व्ही ची भुमिगत विधृत केबल तोडल्याने कन्हानची भर उन्हात तीन तास विधृत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासीयाना भयंकर त्रास सहन करावा लागला. यास्तव दोन दुकान श्रतीगस्त आणि शहरातील तीन तास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने केसीसी बिल्डकॉन कंपनीवर कायदेशीर कारवाही करण्यात यावी याबाबत कन्हान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, राजु पचकलसिया, गंगाधर ढोमणे, वृषभ बावनकर, मुकेश गंगराज , अक्षय फुले, अविनाश हातागडे, मनोहर तिवाडे आदीने उपस्थित राहुन मागणी केली.

महावितरण कंपनीचे दीड लाखाचे नुकसान – सहा.अभियंता ओमकार

केसीसी बिल्डकॉन कंपनीच्या पोकलँड मशीन च्या बकेटने ११ के व्ही ची भुमिगत केबल तोडल्याने कन्हानची भर उन्हात तीन तास विधृत पुरवठा खंडित होऊन दुरूस्ती करिता अदाजे दिड लाखाचा खर्च असुन तीन तास विधृत पुरवठा खंडित झाल्याने
महावितरण कंपनीचे लाखोचे नुकसान झाल्याने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे .