Published On : Mon, Apr 6th, 2020

ना. नितीन गडकरी ७ एप्रिलला घेणार कोरोनासंदर्भात जिल्ह्याचा आढावा

नागपूर : केंद्र सरकारने नागपूर जिल्ह्यातल कोव्हिड-१९ बाबत निरिक्षण आणि आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याच अनुषंगाने नागपूर जिल्हा कोव्हिड-१९ बाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. ७) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार गिरीश व्यास, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ओ.एस.डी. डॉ. फूलपाटील, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया उपस्थित राहतील.