Published On : Thu, Jun 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विधान परिषद निवडणुकीत पैशांचे राजकारण नाही काँग्रेसचा ‘मुद्द्यांचा अजेंडा’; अतुल लोंढेंचा भाजपवर निशाणा

Advertisement

नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी प्रचाराची दिशा बदलल्याचा दावा करत, ही लढाई केवळ सत्तेसाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याचे म्हटले आहे.

अतुल लोंढे यांनी सांगितले की, पूर्वी अशा निवडणुकांकडे ‘पैसा आणि मतांचे समीकरण’ म्हणून पाहिले जात होते. मात्र यावेळी काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यांवर आणि स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपवर टीका करताना लोंढे म्हणाले की, विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसह मैदानात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीची कमतरता, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सुविधा आणि वाढती बेरोजगारी यांसारखे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.

नागपूर शहराच्या विकासावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक वर्षे सत्ता असूनही काही महत्त्वाचे प्रकल्प रखडले असल्याचा आरोप करत त्यांनी कचरा व्यवस्थापन, क्रीडा सुविधा आणि मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधले.

Advertisement

“विधान परिषद हे केवळ राजकारणाचे व्यासपीठ नसून धोरण ठरवण्याचे सभागृह आहे,” असे सांगत लोंढे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना जनहिताच्या प्रश्नांसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, नागपूरमधील काही नगरसेवकांनीही अतुल लोंढे यांना समर्थन देत स्थानिक प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी ते सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दुसरीकडे महायुतीकडूनही विजयाचा दावा केला जात असून, नागपूरची ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनली आहे. निकालानंतर नागपूरच्या राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.