Advertisement
नागपूर: अकोला व अमरावती विमानळावर विमानांची वाहतूक लवकर सुरु व्हावी व या विमानतळांचा विकास व्हावा या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत या दोन्ही विमानतळासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या दोन्ही विमानतळांची भविष्यातील गरज लक्षात घेता प्रवासी व मालवाहतूक विमानांसाठी लागणारी मोठी धावपट्टी, सर्व प्रकारच्या वातावरणात विमानांचे टेकऑफ/लँडिंग करता यावे अशी सूचना ना. गडकरींनी यावेळी अधिकार्यांना दिल्या.
या बैठकीला अमरावतीच्या खा. नवनीत राणा, आ. वसंत खंडेलवाल, आ. राजेंद्र पाटणी व अन्य उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही विमानतळाच्या विकासाचे व्हिडिओ सादरीकरणही दाखविण्यात आले.