Published On : Tue, Sep 29th, 2020

पोलीस हवालदारांचा कोणीच कैवारी नाही: अनिल गलगली,आरटीआई कार्यकर्ता

मुंबई पोलीस आयुक्तालयातील 318 पोलीस हवालदार यांची ताबडतोब पदोन्नतीचे आदेश  निर्गमित करण्यात यावे 
 

मुंबई: वर्ष 2013 मध्ये पोलीस हवालदार यांची अहर्ता परीक्षा ही पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीसाठी घेतली होती या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्याना पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नती देण्यासाठी देण्यासाठी वर्ष 2019 आणि वर्ष 2020 मध्ये माहिती मागवली होती.

महाराष्ट्रातील उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदार पैकी 318 पोलीस हवालदार यांची संवर्ग सहित संपूर्ण माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित ठेवली. ही माहिती मागविण्यात पूर्वी गृह विभागाची परवानगी घेतली होती त्यामध्ये विशेष करून कायदा विभाग आणि महसूल विभागाची देखील परवानगी समाविष्ट होती.

शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदोन्नतीतील आरक्षणाबाबत दिनांक 29/12/2017 रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले आहे यामध्ये वर्ष 2004 नंतर ज्या मागासवर्गीय पोलीस हवालदाराने पदोन्नती स्वीकारली होती,  त्यांची नावे वगळून मुंबई पोलीस आयुक्तालयातील 318 पोलीस हवालदार यांची माहिती मागविली होती मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाने पुन्हा मागासवर्गीय कर्मचारी/हवालदारांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी किंवा कसे याबाबत गृह विभागाकडे पत्रव्यवहार केला.

यानुसार दिनांक 28 /09/2020 रोजी राज्याचे गृहमंत्री श्रीमान अनिल देशमुख साहेब यांनी वर्ष 2013 मध्ये अहर्ता परिक्षा उत्तीर्ण झालेल्या हवालदारांना पदोन्नती देण्याची मान्यता दिली, यामध्ये ज्या पोलीस हवालदार यांनी सन 2004 नंतर आरक्षणाचा फायदा घेऊन पदोन्नती घेतली होती त्यांनादेखील पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे दिनांक 29/9/2020 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक अस्थापना शाखा श्री राजेश प्रधान यांनी आदेश निर्गमित करुन आरक्षणाचा लाभ घेतलेल्या पोलीस हवालदार यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती देण्यासाठी त्यांचेकडून संवर्गाची माहिती दिनांक 06/10/2020 पूर्वी मागविली आहे यामुळे जे 318 पोलीस हवालदार आहेत त्यांची पदोन्नती रखडली आहे वास्तविक पाहता 318 पोलीस हवालदार यांची संपूर्ण माहिती प्राप्त असतानासुद्धा त्यांना वेठीस ठेवून तसेच त्यांच्यापैकी काही सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देखील त्यांना पदोन्नती न देता केवळ गृहखात्याकडे नाहक पत्रव्यवहार करून पदोन्नती रखडवली आहे.

यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तसेच शासनाच्या दिनांक 19/12/2020 रोजीच्या परिपत्रकाचा भंग झाला असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या या कारभारामुळे अनेक पोलीस हवालदार अक्षरशः कंटाळले आहेत. पोलीस हवालदार यांचा कोणीच कैवारी नसल्याने पोलीस महासंचालक कार्यालय जाणूनबुजून चालढकल करत वेलखाऊ धोरणांचा अवलंब करत आहे.

आपणास पुन्हा विनंती करतो की कमीत कमी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 318 पोलीस हवालदार यांची ताबडतोब पदोन्नतीचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयास निर्गमित करण्याचे आदेश द्यावेत.

..अनिल गलगली