भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे आयोजन
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपा प्रदेश सचिव तथा प्रभाग २६ चे नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या वतीने प्रभाग २६ मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे, संपर्क प्रमुख प्रा. प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेविका मनीषा कोठे, कोहिनूर लॅानचे प्रोप्रा. कमलेश नागपाल आदींनी प्रामुख्याने भेट दिली.
यावेळी दिपक पाटील व त्यांच्या पत्नी करूणा पाटील या दाम्प्त्याने आवर्जुन रक्तदान केले.
सध्याच्या कोरोनाच्या संकटात रक्तदानाच्या अभावाने रक्तपेढ्यांध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. समाजकार्याचा वसा घेतलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त केलेले सामाजिक कार्य हेच त्यांच्यासाठी मोठी भेट ठरणार आहे. या उद्देशाने प्रभागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे अशी भावना यावेळी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली.
रक्तदान शिबिराच्या आयोजनाकरिता प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख, महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती वाघमारे, कविता हत्तीमारे, सिंधू पराते, युवा मोर्चा अध्यक्ष लकी वराडे, अनंता शास्त्रकार, प्रज्वल चानोरे यांनी सहकार्य केले.