Published On : Thu, Aug 6th, 2020

सेव्हन स्टार हॉस्पिटलला मनपाची नोटीस :२४ तासात मागितले स्पष्टीकरण

नागपूर : रुग्णांकडून अधिक शुल्क वसुली व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी नंदनवन येथील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाला नोटीस बजावून यासंदर्भात २४ तासात स्पष्टीकरण मागितले आहे.

कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेव्हन स्टार हॉस्पिटल अधिकृत करण्यात आले आहे. हॉस्पिटलने शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु ३ व ४ऑगस्ट रोजी मनपाच्या पथकाने रुग्णालय परिसराची पाहणी केली व रेकॉर्डची तपासणी केली असता दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे आयुक्तांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.याशिवाय अनेक बाबतीत रूग्णालयात अनियमितता आढळून आल्याने यासंदर्भात आयुक्तांनी स्पष्टीकरण मागितले आहे. सोबतच आपल्या विरोधात महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन आवश्यक सेवा कायदा मुंबई नर्सिंग होम कायद्यांतर्गत कारवाई का करू नये असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून नियमांच्या तुलनेत ५८ टक्के अधिक शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भातही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. अशी आढळली अनियमितता रुग्णालयाच्या दर्शनी भागात दर फलक लावण्यात आलेला नाही. ८० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आलेले नाही. रुग्णाकडून अधिकचे शुल्क जमा करून घेतले जाते. परंतु डिस्चार्ज देताना ही रक्कम रुग्णांना परत केली जात नाही.

Advertisement
Advertisement