Published On : Thu, May 31st, 2018

मनपातील २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील विविध विभागातील २४ कर्मचारी आज ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला निगम अधीक्षक राजन काळे, समिती अधीक्षक सुनील रोटके, सहायक अधीक्षक (भविष्य निर्वाह निधी) दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक (सामान्य प्रशासन विभाग) मनोज कर्णिक, डोमाजी भडंग प्रामुख्याने उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मान्यवरांनी शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे आणि भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देऊन सत्कार केला. सत्कारमूर्तींमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. शिंदे, राजस्व निरीक्षक के.जी. सोमकुंवर, डब्ल्यू. एस. वानखेडे, कनिष्ठ निरीक्षक पी.डी. रंगारी, के.बी. सोनवानी, हवालदार ओ. एम. मांडवेकर, मोहरीर रमेश ढवले, स्वास्थ निरीक्षक एस. के. गोरे, मुख्याध्यापिका लता बागडे, सहायक शिक्षिका सरोज खाडे, सविता शाहू, चपराशी एच.सी. मोहनिया, क्षेत्र कर्मचारी एन.पी. जांभुळकर, रेजा श्रीमती सी.डी. सुखदेवे, मजदूर श्रीमती एल. आर. बागडे, रमेश लोखंडे, चपराशी मिलिंद लवत्रे, मजदूर कांता जीवनतारे, सफाई कामगार राजाबाई समुंद्रे, प्रकाश समुंद्रे, श्रीमती गेंदा बिहुनिया, सुनीता कोल्हटकर, नामदेव डांगे, विजय पिल्लेवान यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. संचालन प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. आभार डोमाजी भडंग यांनी मानले.