Published On : Fri, Mar 23rd, 2018

शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू शहीद दिना निमित्त म.न.पा. तर्फे विनम्र अभिवादन


नागपूर : देशासाठी बलिदान देणा-या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या छायाचित्राल पुष्पहार अर्पण करून नागपूर नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मनोज सांगोळे, अति. आयुक्त रविंद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजाना लाडे, उपायुक्त रविंद्र देवतळे, अति. उपायुक्त राजेश मोहिते, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय जैस्वाल, निगम सचिव हरिश दुबे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, कार्यकारी अभियंता जी.टी. वासनिक आदी उपस्थित होते.