Published On : Sun, May 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आता महानगरपालिका च करणार आमराई जंगलातील 61 ते 65 वृक्षांची करणार.

ह्या संदर्भात नोटीस केली जारी...झाडावर लावल्या नोटीस
Advertisement

नागपूर, मे 16: आमराई चे जंगल (ओल्ड एअरपोर्ट रोड अर्थात जुना सोनेगाव विमानतळ रस्ता च्या आजूबाजूचे भोसले कालीन घनदाट जंगल), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर् (प्रभाग 36) मधील नागरिकांसाठी आजकाल सर्वात फेव्हरेट मॉर्निग वॉक रोड. संपूर्ण परिसर कसा सगळं ग्रीन ग्रीन आणि ब्युटीफुल. गर्द रानात राजे रघुजी भोसले च्या काळात
आधी आमराई असेल पण आता सुबाभूळ आणि इतर प्रकारची झाडे खूप आणि त्यामध्ये असलेले एक खूप सुरेख मुरलीधर मंदिर … अतिशय देखणे मंदिर.अतिशय रम्य परिसर.

साधारण ३०० वर्षांपूर्वी हा परिसर नुसता आंब्याची मोठं मोठाली झाड असलेली असा होता असे जुने लोक सांगतात आता .. देवळा जवळ खूप मोठे दोन-तीन आंब्याचे वृक्ष पण मोहरलेले दिसतात ..पण ह्या सर्वच गोष्टींचा साक्षीदार म्हणजे एक मोठे वडा चे झाड येथे आजही अस्तित्वात आहे .भोंसलेकालीन विहीर पण येथे आहे.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अश्या ह्या गर्द हिरव्या कंच जंगल भागाला आता ग्रहण लागणार आहे. नागपूर महानगर पालिका जिने ह्या जंगलाचे संरक्षण करायला हवे तिच आता ह्या जंगलाच्या जीवावर उठली आहे.

नागपूर महानगर पालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यकारी अभियंता ह्यांनी ह्या जंगलातील जवळपास 61 ते 65 वृक्ष तोडण्यासाठी उद्यान विभागामार्फत नोटीस जारी केली आहे. अर्थात मनपा जी झाडे लावा..झाडे जगवा चा प्रचार करते ती स्वत: 61 ते 65 मोठ मोठ्या झाडांची कत्तल करणार आहे.

Advertisement

मनपा नोटीस म्हणते की सहकार नगर घाट ते मुळीक कॉम्प्लेक्स येथील भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या जागेतून (आमराई जंगल चा च भाग) मलवाहीका टाकण्याच्या बांधकामात् आणि खोदकामात ही 60-65 वृक्ष अडथळा निर्माण करीत आहेत . ज्यात बाभूळ (20), हिवार (7) काट सावर (1), महारुख (2) बोराची झाडे (12) आडजात (2) सुबाभूळ (2) कडुलिंब (3), चिंच बिलाई (3) करंज (1), अशोका ( 1), बेल (1) निलगिरी (3), पळस (1), जांभूळ (1) आणि वडाचे झाड ( 1). मनपा नोटीसेप्रमाणे ह्या पैकी फक्त 3:हेरिटेज आणि 58 नॉन हेरिटेज झाडे आहेत.

ह्या बाबतीत मनपा ला घाई किती ? आक्षेप आणि सुनावणी च्या आधीच ह्या सर्व वृक्षावर नोटीस लावण्यात आलेल्या आहेत.

ह्या भागातील जुने जाणते लोक सांगतात ही झाडे बरीच जुनी आहेत्.

पूर्वी जागा एअरफोर्स कडेच होती. पूल उतरल्यावर त्यांचे फाटक होते. तिथे बरीच गर्द आमराई होती. गावठी रायवळ आंबे बरेच होते. काळया डोक्याच्या मोठ्या माकडांच्या टोळ्या होत्या. रस्त्याच्या कडेला गोखरू चे रान होते.

मुरलीधर मंदिर झाडांमध्ये आणि त्यावर चढलेल्या वेली मध्ये पूर्ण लपले होते. तिथल्या समोरच्या दगडी ओट्यावर पावसाळा लागला की कायम साप दिसत. पोहरा नदीवरचा मूळ पूल भोसलेकलीन, एका दगडी कमानीवर मधला भाग उचललेला होता. त्याच्या दगडांचे सुंदर ड्रेसिंग केलेले होते. त्याच्या बाजूला जे स्मशान आहे त्याच्या आजूबाजूला मोठी उंच झाडे आहेत आणि होती . त्यावर मोठ्या संख्येने गडद पंखांची, पिवळ्या चोची असलेली गिधाडे असायची. नंतर ती दिसेनाशी झाली.
पर्यावरणवादी कार्यकर्ते पत्रकार / समाजिक कार्यकर्ते सचिन द्रवेकर तसेच इतर पर्यावरणवादी
संघटना चे कार्यकर्ते ह्यांनी ह्या वृक्ष कटाईचा विरोध दर्शवीत मनपा ने त्यांच्याच SOP प्रमाणे एक झाड च्या बदल्यात 5 झाडे ह्याच आमराई जंगल परिसरात लावावी…वाढवावी…जगवावी आणि मगच ही मलवहिनी टाकावी अथवा मलवाहिनीचा मार्ग बदलावा.

सर्व् आमराई प्रेमी नागरिक आणि पर्यावरणवादी संघटना चे कार्यकर्ते ह्यांनी ह्या वृक्ष कटाईचा प्रखरव विरोध केला आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj Roshan

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj...

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka #parlour #crime #newsupdate

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka...

₹50 के विवाद में खूनी हमला ! #nagpurnews #crime #murdernews #newsupdate

₹50 के विवाद में खूनी हमला ! #nagpurnews #crime #murdernews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges