Published On : Fri, Mar 15th, 2019

कविवर्य सुरेश भट पुण्यतिथीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे कविवर्य सुरेश भट यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवारी (ता.१४) कविवर्य सुरेश भट यांना अभिवादन करण्यात आले.

Advertisement

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या दर्शनी भागात असलेल्या सुरेश भट यांच्या पुतळ्याला मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisement

याप्रसंगी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सुरेश भटांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, आरोग्य अधिकारी सरीता कामदार, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतुल, सभागृहाचे व्यवस्थापक प्रदीपकुमार तुंबडे, मनपा शाळेचे कला शिक्षक कमलाकर मानमोडे उपस्थित होते.

Advertisement

कविवर्य सुरेश भट यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरेश भटांच्या ‘एल्गार’ आणि ‘भीमवंदना’ या दोन रचनांचे वाचन करण्यात यावे अशी इच्छा कविवर्य सुरेश भट यांची मुलगी विशाखा भट महाजन यांनी व्यक्त केली होती.

त्यानुसार सभागृहाचे व्यवस्थापक प्रदीपकुमार तुंबडे यांनी ‘एल्गार’ तर मनपा शाळेचे कला शिक्षक कमलाकर मानमोडे यांनी ‘भीमवंदना’ या कवितांचे वाचन करून कविवर्य सुरेश भट यांना अभिवादन केले.

यावेळी सुधीर कोरमकर, विलास चितलवार, परमानंद लोणारे, बलवंत गजबे, विनय कांबळे, चेतन सातपुते आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement