धंतोली जलकुंभ ३ फेब्रु, राम नगर जलकुंभ ५ फेब्रु, राम नगर GSR ७ फेब्रु व वाडी टेकडी १० फेब्रुवारी रोजी
नागपूर: लक्ष्मी नगर झोन, लकडगंज झोन, हनुमान नगर झोन, धंतोली झोन व नेहरू नगर झोनच्या जलकुंभ स्वच्छतेनंतर नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी धरमपेठ झोन मधील जलकुंभ स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत धंतोली जलकुंभ ३ फेब्रु, राम नगर जलकुंभ ५ फेब्रु, राम नगर GSR ७ फेब्रु व वाडी टेकडी १० फेब्रुवारी रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे.
धंतोली जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा ३ फेब्रुवारी सोमवार रोजी बाधित राहणारे भाग: तकिया धंतोली, फकीरवाडी, सरस्वती नगर, छोटी धंतोली, धंतोली, कॉंग्रेस नगर, रहाटे कॉलोनी
राम नगर जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा ५ फेब्रुवारी बुधवार रोजी बाधित राहणारे भाग: गोकुळपेठ, वाल्मिकी नगर, टिळक नगर, राम नगर, मरारटोली, तेलंगखेडी, P&T कॉलोनी, भरत नगर, हिंदुस्तान कॉलोनी, अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट, यशवंत नगर, वर्मा लेआऊट, अंबाझरी टेकडी, सुदाम नगर, जय नगर, सेवा नगर, पांढराबोडी.
राम नगर GSR स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा ७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी बाधित राहणारे भाग: शिवाजी नगर, गांधी नगर, कोर्पोरेशन कॉलोनी, डागा लेआऊट, हिल रोड, शंकर नगर, खरे टाऊन, भागवाघर लेआऊट, धरमपेठ एक्सटेन्शन, माता मंदिर रोड, त्रिकोणी पार्क, शिवाजी नगर एक्सटेन्शन, मामा रोड
वाडी टेकडी जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा १० फेब्रुवारी सोमवार रोजी बाधित राहणारे भाग: साई नगर, वाडी, वैभव नगर.
या कामांदरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.
For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899

