
नागपूर,: ग्राहकांना अधिक चांगला अनुभव आणि सुलभ “वन-टच” सेवा देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (NMC–OCW) यांनी जलग्राहकांची नोंद अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
एनएमसी–ओसीडब्ल्यू यांनी सर्व जलग्राहकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद ओसीडब्ल्यू प्रणालीत योग्यरीत्या झालेली आहे याची खात्री करून घ्यावी. ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक जुने आहेत, प्रणालीत नोंदलेले नाहीत किंवा ज्यांना ओसीडब्ल्यूकडून नियमित माहिती मिळत नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर आपले तपशील अद्ययावत करावेत.
आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा:
1. QR कोड स्कॅन करा किंवा ocwindia.com/kyc येथे भेट द्या.
2. आपला CAN (Consumer Account Number) टाका – तुमचे नोंदणीकृत ग्राहक नाव प्रणालीतून आपोआप दिसेल.
3. अद्ययावत करावयाचा नवीन मोबाईल क्रमांक टाका.
4. आपल्या पाणीमीटरचा थेट (live) फोटो काढा.
5. फोटो घेताना स्क्रीनवरील सूचनांचे नीट पालन करा.
6. फोटो प्रीव्ह्यू करा आणि ‘Submit’ क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा.
7. गरज असल्यास, ‘Go Back’ क्लिक करून पुन्हा फोटो घ्या.
या उपक्रमामुळे जलग्राहकांना बिलिंग, पाणीपुरवठा वेळापत्रक आणि इतर सेवांबाबतची माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वेळेवर मिळण्यास मदत होईल.
प्रक्रियेदरम्यान तुम्हाला काही अडचण आल्यास, अधिक मदतीसाठी कृपया जवळच्या झोन ऑफिसला भेट द्या.
अधिक माहितीसाठी NMC-OCW हेल्पलाइन 1800 266 9899 वर संपर्क साधा किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करा.









