Published On : Sat, Jul 11th, 2020

नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज, आशी नगर, व मंगळवारी झोनच्या काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बाधित

Advertisement

शटडाऊन दरम्यान व नंतर टँकर पुरवठा राहणार बंद, ८ तासांचे ५००मिमी चा व्हॉल्व बदलण्यासाठीचे शटडाऊन जयताळा येथे १३ जुलै (सोमवार) रोजी

नागपूर, ११ जुलै, २०२०: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे १३०० व ९०० मिमीच्या फीडर लाईन्सवरील मोठ्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी १४ जुलै सकाळी ११ ते १५ जुलै सकाळी ११ दरम्यान शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

या २४ तासांच्या शटडाऊनमुळे संपूर्ण नेहरूनगर झोन, लकडगंज झोन, सतरंजीपुरा झोन, आशीनगर झोन, व मंगळवारी झोनचा काही भाग बाधित राहील. या भागांना शटडाऊननंतरच्या २४ तासांत कमी दाबाने व मर्यादित पाणीपुरवठा होईल.

हे मोठे शटडाऊन असल्याकारणाने यादरम्यान व नंतर टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही.

या शटडाऊन दरम्यान खालील कामे प्रस्तावित आहेत.

कन्हान केंद्राच्या १३०० मिमी व्यासाच्या फीडर लाईनवर:

1. सक्करदरा ९०० मिमी लाईनवरील बॉलीवूड सेंटर पॉईंटसमोरील गळतीची दुरुस्ती

2. सुभान नगर शाखेवरील फीडर व्हॉल्वमधील गळतीची दुरुस्ती

3. पारडी जलकुंभाच्या ६ व्हॉल्वची प्रतिबंधात्मक देखरेख

कन्हान ९०० मिमी व्यासाच्या फीडर लाईनवर:

1. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम:- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टाकलेल्या ९०० मिमी फीडर लाईनवर उप्पलवाडी पूल येथे संयुक्तपणे गळतीदुरुस्तीचे काम

कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे:

1. एक्स्प्रेस फीडरच्या इनकमर संरचनेच्या देखभालीचे काम

मनपा-OCWने उपरोक्त भागांमधील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.