टेकडी-वाडी जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित
शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा बंद राहणार..
नागपूर : धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या टेकडी-वाडी जलकुंभावरील संप मधील गळत्या शोधण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ह्यांनी संयुक्तपणे १२ तासांचे टेकडी- वाडी जलकुंभाचे शटडाऊन- फेब्रुवारी १४ (सोमवार ) सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत घेण्याचे ठरविले आहे .
ह्या गळतीला लवकरात लवकर दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे . या कामांमुळे टेकडी-वाडी जलकुंभाचा पाणीपुरवठा सोमवारी पूर्णपणे बाधित राहणार आहे . ह्या कालावधी दरम्यान टँकरद्वारेही
पाणीपुरवठा होऊ शकणार नाही तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर पाणीपुरवठा वेळेनुसार बाधित भागामध्ये पाणी पुरवठा सुरु होणार आहे .
पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग
टेकडी-वाडी जलकुंभ: साई नगर, डॉबी नगर, गुरुदत्त सोसायटी,जय मंगलमूर्ती सोसाटी, लोकमान्य नगर, साई पूर्ण सोसाटी, देशमुख ले आउट, जय हिंद सोसाटी, भाकरे ले आउट, चिखली सोसायटी , प्रशांत सोसाटी, अमित सोसाटी, प्रशांत सोसायटी, वैष्णोमाता नगर, वैभव नगर, दांडेकर ले आउट, टेकडीवाडी स्लम आणि टवाळकर ले आउट आणि इतर भाग ….
ह्या १२ तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.
—