Published On : Mon, May 28th, 2018

मनपातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Savarkar Jayanti celebrated by NMC
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सोमवारी (ता. २८) जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शंकरनगर स्थित पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेवक सुनील हिरणवार, निशांत गांधी, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता, शिवाजी नगर संघचालक डॉ. राजाभाऊ शिलेदार, सावरकर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, अजय कुळकर्णी, प्रा.प्रमोद सोहणी, शिरीष दामले, मुकुंद पाचखेडे, महादेव बाजीराव, उमाकांत रानडे, कमला मोहता, रवींद्र कासखेडीकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Savarkar Jayanti celebrated by NMC
मनपा मुख्यालयात कार्यकारी महापौर आणि आयुक्त यांनी केले अभिवादन
नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक अग्निशमन अधिकारी सुनील राऊत उपस्थित होते.