Published On : Tue, Sep 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मारबत महोत्सवासाठी मनपा सज्ज “मारबत महोत्सवा”च्या अनुषगाने महापौरांनी घेतला आढावा

Advertisement

>मारबत महोत्सवासाठी मनपा सज्ज “मारबत महोत्सवा”च्या अनुषगाने महापौरांनी घेतला आढावा

नागपूर, : नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख असणाऱ्या मारबत महोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत असून, येत्या ११ सप्टेंबर रोजी आयोजित मारबत महोत्सवासाठी मनपा सज्ज आहे. महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. बडग्या-मारबत महोत्सवात सर्वांना उत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले.

नागपूरची पारंपारिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या ‘मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत मंगळवार (ता.८) बैठक पार पडली. बैठकीला स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री.मंगेश खवले, श्री. राजेश भगत, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरुबक्षाणी, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंधाडे,श्री. राजीव गौतम, श्री. गिरीश लिखार, श्री. सचिन रक्षमवार, श्री. अनिल गेडाम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, श्री.विवेक रानडे, श्री.गजानन रानडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Gold Rate
Sept 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,37,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरात पर्यटकांचा ओघ वाढविण्यासह शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसेच नागपूरचा सांस्कृतिक वारसा समृद्धकरण्यासाठी मनपाद्वारे मारबत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

बैठकीत महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मारबत मार्गावर भ्रमण करणाऱ्या नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. सोबतच महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात असेही निर्देश त्यांनी दिले. मारबत व बडग्या यांच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था करण्याच्या सूचना सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर यांनी दिल्या.

Advertisement

तसेच महोत्सवासाठी परदेशातून येणाऱ्या वाणिज्य राजदूत/परदेशी प्रतिनिधी, मा.मंत्री महोदय,लोकप्रतिनिधी, सिनेअभिनेता आदी मान्यवरांच्या शिष्टाचाराचे उत्तम पालन करण्यात यावे, अशी सूचना स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी केली. बैठकीच्या प्रारंभी क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी मारबत महोत्सवाच्या नियोजनासह महोत्सवा अंतर्गत आयोजित भजन संध्या, छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आदी विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.