Published On : Wed, Jan 8th, 2020

प्रभाग क्र. १२ ड चे पोट निवडणूकीसाठी मतदान

नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १२ ड च्या भाजपा नगरसेवक श्री. जगदीश ग्वालवंशी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोट निवडणूकीचे मतदान गुरुवार दिनांक ०९ जानेवारी, २०२० रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत होईल त्यासाठी एकूण ५० मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूकीची मत मोजणी दि.१० जानेवारी, २०२० रोजी धरमपेठ झोन क्र. २ गोकुळपेठ येथे होईल. त्यासाठी ८ टेबल लावण्यात येणार असून ही मतमोजणी सात फे-या करण्यात येईल, असे निवडणूक्‍ निर्णय अधिकारी तथा उपायुक्त श्री. ‍निर्भय जैन यांनी कळविले आहे.