Published On : Thu, Nov 1st, 2018

ठेकेदारांचे मनपात काय काम

नागपूर: थकबाकीसाठी वारंवार आंदोलन करून पदाधिकारी आणि प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या कंत्राटदारांना महापालिकेच्या कक्षातून हुसकावून लावण्यात आले. त्यांचे महापालिकेत काय काम असा सवाल उपस्थित करून स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी कारवाईचे समर्थन केले.

Advertisement

थकबाकी मिळावी याकरिता महापालिकेच्या कंत्राटदार सुमारे महिनाभरापासून आंदोलन करीत आहेत. काही दिवस त्यांनी महापौरांच्या कक्षासमोर धरणे दिली. त्यानंतर दररोज प्रशासकीय इमारतींमध्ये आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या शहरात आंदोलन होत असल्याने या घटनेची राज्यपातळीवर दखल घेतल्या जात होती. विरोधकांतर्फे मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली जात होती. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कारभारावर टीका करणे भाजपच्या नेत्यांना अडचणीचे जात होते. ठेकेदारांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी त्यांचा कक्षच काढून घेण्यात आला.

Advertisement

स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रशासनाच्या कारवाईचे समर्थन केले. ठेकेदारांचा फक्त महापालिकेशी कामापुरता संबंध आहेत. त्यांना बसण्या उठण्यासाठी महापालिकेला सोयीसुविधा देऊ शकत नाही. ठेकेदारांनी स्वतःच्या कार्यालयात बसावे असेही ते म्हणाले. महापालिका आर्थिक अडचणीत आहे. थकबाकी द्यायचीच आहेत. ती बुडविली जाणार नाही. आतताईपणा करण्याची गरज नव्हती.

Advertisement

चर्चा केल्यानंतर त्यांनी थोडा धीर धरण्याची आवश्‍यकता होती. मात्र उठसूठ प्रशासन व पदाधिकाऱ्यांना वेठीस धरल्या जात होते. शहराची प्रतिमा यामुळे मलीन होत होती. दीडशे कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यातून काही रक्कम ठेकेदारांनाही दिली जाणार आहे, असे वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement