Published On : Tue, Sep 1st, 2020

आयुक्तांनी घेतली महापौरांची भेट

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त मा.आयुक्त श्री.राधाकृष्णन बी यांनी मा.महापौर श्री.संदीप जोशी यांची महापौर कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व त्यांचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत केले.

यावेळी उपमहापौर मा.श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती मा.श्री.विजय झलके, सत्तापक्ष नेता मा.श्री. संदीप जाधव आणि अतिरिक्त आयुक्त श्री.राम जोशी उपस्थित होते.