Published On : Fri, May 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विकास कामांच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका ; नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सुनावले

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज शुक्रवारी नागपुरात रवी भवन सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रकल्पांच्या तसेच विकास कामांच्या दर्जाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

रेशीमबाग मैदानाचा विकास, स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत वाकी, धापेवाडा, पारडसिंगा व गिरड तिर्थक्षेत्राचा विकास, मौदा मार्गावरील परमात्मा एक सेवक प्रकल्प, पश्चिम व उत्तर नागपुरातील रस्त्यांची कामे, पुनापूर-भरतवाडा येथील विटा भट्टीच्या जमिनीचा प्रश्न, चौक व उद्यानांचे सौंदर्यीकरण इत्यादी अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. विकास योजनांसाठी वापरला जाणारा पैसा हा जनतेचा आहे. आपण त्याच्या योग्य वापराची काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण आपण त्या निधीचे विश्वस्त आहोत, असे म्हणत नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रकल्प, योजना तसेच विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, मोहन मते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, नासुप्रचे सभापती डॉ. मनोज सूर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement