Published On : Sat, Mar 23rd, 2019

नितीन गडकरी यांचे विमानतळावर जंगी स्वागत

भाजपा पदाधिकार्‍यांसह हजारोंची उपस्थिती

नागपूर: केंद्रीय मंत्री व भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांचे आज सकाळी विमानतळावर जिल्हा व शहर भाजपातर्फे संदलच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. भाजपाच्या पदाधिकार् यांसह हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची घोषणा दिल्ली येथून झाल्यानंतर प्रथमच नितीन गडकरी नागपुरात आले. त्यानिमित्त त्यांचे जोरदार स्वागत विमानतळावर करण्यात आले. गडकरींनी हात उंचावून सर्वांना नमस्कार करीत कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.

यावेळी विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. दत्ता मेघे, खा. कृपाल तुमाने, आ. अनिल सोले, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. गिरीश व्यास, आ. ना.गो. गाणार, शहर भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. डॉ. मिलिंद माने, स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अशोक धोटे, अरविंद गजभिये, विकास तोतडे, अविनाश खळतकर, धर्मपाल मेश्राम, भोजराज डुंबे, बंडू राऊत, अविनाश ठाकरे, चरणसिंग ठाकूर, श्रीकांत देशपांडे, किशोर रेवतकर, किशोर पालांदूरकर, आदींसह हजारोंच्या संख्येने महिला कार्यकर्त्यां, पदाधिकारी तसेच जिल्हा व शहराचे कार्यकर्ते उपस्थित होते.