Published On : Thu, Nov 15th, 2018

नासुप्र द्वारे पश्चिम नागपुरातील ३ धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही

नागपूर : मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नागपूर सुधार प्रन्यास तर्फे नासुप्र सभापती श्री. अश्विन मुद्द्गगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधिक्षक अभियंता (मुख्यालय) श्री. सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय/सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. दिनांक १५.११.२०१८ रोजी नासुप्रच्या पश्चिम विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

ज्यामध्ये नासुप्रच्या क्षतीपथकाने पश्चिम नागपुरातील मौजा खामला येथील (१) शांतीनिकेतन को. ऑप. हॉ. सोसायटी (हनुमान मंदिर) (२) स्वामी निवारा सेवा संस्था (हनुमान मंदिर) व (३) देव नगर (महाकाली मंदिर) येथील रस्त्यावरील/फुटपाथवरील धार्मिक स्थळ अश्या या दोन धार्मिक स्थळांचा समावेश होता. तत्पूर्वी नासुप्रच्या क्षतिपथकांना नागरिकांनी मदत केली त्यांनी सामंजस्यपणा दाखवित मंदिरामधील मूर्ती स्वतः काढून घेतल्या व मंदिर रिकामे करून दिले. अश्या एकूण ३ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही २ टिप्पर आणि २ जेसीबी च्या साहाय्याने आज दुपारी ११.०० ते सायकांळी ५.०० वाजेपर्यंत करण्यात आली.

सदर कार्यवाही कार्यकारी अभियंता(पश्चिम) श्री. प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री. पंकज डी. आंभोरकर, कनिष्ठ अभियंता श्री. भगवान कुर्झेकर, स्थापत्य अभि. सहाय्यक श्री. निलेश तिरपुडे व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच प्रताप नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली.