| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Sep 20th, 2018

  नागपुरातून चीनकडे उड्डाण भरणार नऊ विमाने

  Airplane

  नागपूर : सौदी अरबच्या वायुसेनेच्या दोन वैमानिकांची बुधवारी सायंकाळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. २८ आॅक्टोबरला सौदी वायुसेनेची नऊ विमाने नागपूर विमानतळावर इंधन (एटीएफ) भरणार आहेत. इंधन भरल्यानंतर ही विमाने थेट चीनच्या ज्युहाई शहरात आयोजित हवाई शोमध्ये सहभागी होणार आहेत.

  खाडी देश जगाला स्वस्त दरात पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करते, पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी इंधन भरावे लागत आहे. नागपुरात अन्य शहरांच्या तुलनेत पेट्रोलचे भाव जास्त आहेत. पण हवाई इंधनासाठी ही बाब महत्त्वाची ठरत नाही.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145