Published On : Thu, Oct 11th, 2018

निमखेडा – निमखेडा नहाराला पाणी सोडण्याची शेतकऱ्याची मागणी

Advertisement

कन्हान : – कमी पावसाने पेंच धरणाचे पाणी न सोडण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने त्यांच्या हाके धावुन
पालकमंत्री बावनकुळे याच्या आदेशाने पेंच धरणाचे पाणी सोडण्यात आले . परंतु पाणी सुटुन २० दिवस झाले तरी सुध्दा पारशिवनी तालुक्यातील निमखेडा (गो.पा.) गावाच्या नहराला पाणी न आल्याने शेतकऱ्यांची ६० के ७० % धान पिकांचे नुकसान झाले आहे .

त्वरित नहराचे पाणी न मिळाल्यास धान पिकाचे भयंकर नुकसान होणार असल्याने युवा शेतकरी नेते महेंद्र भुरे यांच्या नेतृत्वात शेतकरी दिनांक २८/९/२०१८ ला पेंच पटबंधारे विभाग टेकाडी उपविभागीय कार्यालयात पोहचुन सहाय्यक अ़भियंता श्रेणी २ शाखा डुमरी राणु गवळी यांना सांगितले की, आमच्या नहाराला पाणी न आले तर आमच्या पिकांचे अतोनात नुकसान होणार मग आम्ही बँकेचे कर्ज कसे फेडणार, परिवाराचा उद्निवाह कसा करणार या आपल्या व्यथा सागुन तेलनखेडी – निमखेडा मायनर ला पाणी सोडण्याची विनतीसह मागणी केली असता समाधानकारक उत्तर न देता मी काही करू शकत नाही .

Gold Rate
22 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,51,700/-
Gold 22 KT ₹ 1,41,100 /-
Silver/Kg ₹ 3,08,600 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाणी लवकर पाहिजे तर तुम्ही जाऊन पाणी आणा . यावर शेतकऱ्यानी वरिष्ठाकडे तक्रार करण्याचे म्हटले तर कुठे तक्रार करायची करा . अश्या प्रकारे शेतकऱ्याना अपमानित करून परत केले .

चिंताग्रस्त शेतकऱ्यानी पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे , अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता , पेंच पटबंधारे विभाग अजनी , नागपुर यांना निवेदन देऊन त्वरीत तेलनखेडी -निमखेडा मायनर ला पाणी सोडुन शेतकऱ्याला जगविण्याची विनती केली .

आणि बेजबाबदार सहाय्यक अ़भियंता श्रेणी २ शाखा डुमरी राणु गवळी यांना निलंबित करण्याची मागणी महेंद्र भुरे, अमोल सारोरे, बैशाखु जनबंधु, राहुल टेकाम, गणेश सरोदे, संजय बगाईतकार, अनुप भुते, गजानन चांदेकर, यशवंत वाडिभस्मे, अशोक वाडिभस्मे, शिवदास तडस, बंडु भुते, श्याम चांदेकर, दुर्वेश मेंघरे, सहादेव मेंघरे, नरेश हिंगे, सुरेश हिंगे, मंगेश वाडिभस्मे, पंकज बगाईतकार, हिरामन मेंघरे, सुधाकर वाडिभस्मे आदी शेतकऱ्यांनी केली आहे .
Attachments area

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement