Published On : Thu, Sep 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिशा सालियान प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना ५०० कोटींची मानहानी नोटीस

Advertisement

दिशा सालियान प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना ५०० कोटींची मानहानी नोटीस

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणात नवी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.

नोटिशीत दोन्ही नेत्यांनी सतीश सालियान यांचा मुलीच्या मृत्यूबाबत न्याय मिळवण्याचा प्रयत्न हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सात दिवसांच्या आत बिनशर्त, स्पष्ट आणि सार्वजनिक माफी मागावी, तसेच ही माफी प्रमुख वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांमधून प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच ५०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागण्यात आली आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, दिशा सालियान यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर २ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे निर्देश दिले होते. सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी दिशा सालियान यांच्या प्रकरणाचा यापूर्वी सीबीआयने तपास केला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर सीबीआयला एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान यांना आपण कधीही भेटलो नसल्याचे सांगत त्यांच्याशी संबंध जोडण्याचे प्रयत्न हा खोटा प्रचार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील आरोप आणि दावे सध्या तपास व कायदेशीर प्रक्रियेच्या अधीन आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.