Published On : Tue, Jan 23rd, 2018

शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणी

मुंबई : शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे, चंद्रकात खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची नेतेपदी घोषणा करण्यात आलीय.

तर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे सचिव म्हणून काम पाहतील.

खासदार अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, अनिल परब, डॉ. अमोल कोल्हे, मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली

स्वबळाचा ठराव
या बैठकीत स्वबळाचा ठराव मंजूर करण्यात आलाय. आगामी लोकसभा आणि विधानसभा शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचं ठराव बैठकीत मंजूर करण्यात आलाय.

शिवसेनेचे एकूण १३ नेते असतील

मनोहर जोशी
सुधीर जोशी
लीलाधर ढाके
दिवाकर रावते
संजय राऊत
रामदास कदम
गजानन कीर्तीकर
सुभाष देसाई

नविन नियुक्ती

आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदे
चंद्रकांत खैरे
आनंदराव अडसूळ
अनंत गीते