नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर काँग्रेस कमिटीने मानवाधिकार सेलसाठी नवीन नेतृत्व जाहीर केले आहे. कार्यकारी अध्यक्षपदी सिद्धार्थ ऊके तर महासचिवपदी अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
शहरातील कार्यकर्त्यांनी पक्षाचे आदेश आणि कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, तसेच नागपूरमध्ये प्रभाव निहाय समित्या व कार्यकारिणी तयार कराव्यात, असे उद्देश आहे.
यासाठी राहुल मोरे यांनी अधिकृत पत्राद्वारे सिद्धार्थ ऊके व अशोक पाटील यांचे अभिनंदन आणि सत्कार केला. ही माहिती मानव अधिकार सेलच्या अध्यक्ष राहुल मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.