| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 23rd, 2021

  दरोड्याचा दोन गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

  – तीन आरोपी अटक, 30 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त,सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या मदतिने लागला सुगावा

  कामठी:- स्थानीक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकात पायी पायो जात असलेल्या दाल ओली रहिवासी मिलिंद कनोजिया नामक तरुणाला तीन अज्ञात आरोपीने बळजबरीने मारझोड करून त्याला लुबाडणूक केल्याची घटना नुकतीच घडली असता यासंदर्भात फिर्यादी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवीत तपासाला दिलेल्या गतीतून जयस्तंभ चौकात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये असलेली चित्रफिती तसेच गुप्त बातमी दाराद्वारे मिळालेल्या माहिती वरून सदर तिन्ही आरोपी रामगढ कामठी चे रहिवासी असल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित तीन आरोपीना अटक केले

  दरम्यान आरोपीनि जयस्तंभ चौकात केलेल्या दरोड्यासह दहा दिवसापूर्वी रणाळा भिलगाव मार्गावर केलेल्या दरोड्याची कबुली सुद्धा दिली या दोन्ही दरोड्याचा घटनेचा पर्दाफाश करीत त्यांच्याकडून एम एच 40 ए पी 7265 क्रमांकाची मेस्ट्रो दुचाकी किमती 20 हजार रुपये नगदी 300 रुपये तसेच दुसऱ्या दरोड्याचा घटनेतील नगदी 500 रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल कीमती 10 हजार रुपये असा एकूण दोन्ही दरोड्याच्या घटनेतील 30 हजार 800 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यत आलं असून अटक आरोपी चे नाव अरबाज खान जबबार खान वय 19 वर्षे, सोनू दुल्लेखान वय 26 वर्षं , फरदिन खान संमशुद्दीन खान वय 20 वर्षे तिन्ही राहणार रामगाढ कामठी असे आहे.
  ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोतपल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, एपीआय सुरेश कर्नाके, मनोहर राऊत, ललित शेंडे, रोशन पाटील, निलेश यादव , प्रमोद वाघ आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
  – संदीप कांबळे,कामठी

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145