Published On : Fri, Aug 7th, 2020

रविदास नगर च्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त,चार आरोपोच्या अटकेसह 4 लक्ष 77 हजार 760 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रविदास नगर परिसरातील एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यानि जवळपास 11 लक्ष 12 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना 25 जुलै ला निदर्शनास आली असता या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून यातील चार आरोपीचा शोध घेत त्यांच्यावर कायदेशीर रित्या गुन्हा नोंदवून अटक करीत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 4 लक्ष 77 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.तर अटक चार आरोपीमध्ये मुख्य सूत्रधार शेख यासीन शेख युसूफ वय 36 वर्षे रा लुंबिनी नगर कामठी, मो आरिफ मो मिजान वय 25 वर्षे रा मांजरी नागपूर, शेख साजिद उर्फ काल्या शेख जमालूद्दीन अन्सारी वय 25 वर्षे रा चित्तरंजनदास नगर कामठी तसेच सुवर्ण कारागीर विकास खरवडे चा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविदास नगर येथील शिमले कुटुंबातील सदस्य हे कोरोनाबधित आढळल्याने त्यांना नागपूर च्या मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले होते तर यांच्या कुटुंबातील एक सदस्य फिर्यादी मोतीलाल शिमले हे निगेटीव्ह आढळल्याने त्यांना पाचपावली कोरोन्टाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते .तर घर हे कुलूपबंद असल्याची कुणकुण मास्टरमाइंड आरोपी शेख यासीन ला लागताच यांनी योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपी मो आरिफ व शेख साजिद ला संगतीला घेत सदर कुलूपबंद घरातील कुलूप तोडुन घरात अवैधरित्या प्रवेश करुन घरातील बेडरूम मधील लाकडी आलमारी तील सोन्या चांदीचे दागिने, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण जवळपास 11 लक्ष 12 हजार रुपयांची घरफोडी करण्यात यश गाठले तसेच यातील सोन्या चांदीचे दागिने गलविण्यासाठी आरोपी सुवर्ण कारागीर विकास खरवडे याकडून सोन्याचे दागिने गळवून घेतले.सदर घरफोडी प्रकरणाचा तपास तर्कशक्ती च्या आधारावर केला असता गुप्तचर पद्धतीने मिळालेल्या माहितीनुसार मुख्य मास्टरमाइंड आरोपी शेख यासीन ला अटक करून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत सदर गुन्ह्यात सहभागी असलेले समस्त आरोपीची नावे सांगितले यातील आरोपी शेख साजिद उर्फ काल्या हा रायपूर ला पसार झाल्याची माहिती कळताच मोबाईल ट्रेसिंग करून छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथून आरोपी साजिद उर्फ काल्यास अटक करून 15 हजार 500 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला तसेच आरोपी मो यासिन कडून 8400 रुपये किमतीच चांदी, आयुष कंपणीचा मोबाईल किमती 2000 रुपये असा एकूण 10 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला , आरोपी सुवर्ण कारागीर विकास खरवडे यांच्याकडून 46 हजार 700 ग्रामची सोन्याचे दागिने गळविलेले लगडी किमती 2 लक्ष 56 हजार 800 रुपयांचे सोने जप्त करण्यात आले , आरोपी मो आरिफ कडून बजाज पलसर 220 किमती 1 लक्ष रुपये ची दुचाकी जप्त करण्यात आली तसेच सोन्याची चैन असा एकूण 1 लक्ष 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असा चारही आरोपी कडून चोरीस गेलेल्या 11 लक्ष 12 हजार रुपयाच्या मुद्देमालातुन 4 लक्ष 77 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आर आर पाल, यांच्या मार्गदर्शनार्थ गुन्हे प्रगटीकरंण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विनोंद धोंगडे, पो हवा राजेश साखरे,सतीश मोहोड,श्रीकृष्णा दाभने, निलेश यादव, ललित शेंडे तसेच परिमंडळ क्र 5 चे सायबर एक्सपर्ट उपेंद्र आकोटकर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement