Published On : Mon, Feb 17th, 2020

नवीन शैक्षणिक धोरणाचे दुष्परिणाम बहुजन समाजावर होणार : घोडेस्वार

नागपुर : केंद्र सरकारच्या डॉ कस्तुरीरंगन यांनी तयार केलेल्या *नवीन शैक्षणिक धोरण 2019 चे* बहुजन समाजावर दुष्परिणाम होणार असल्याने या धोरणाच्या विरोधात बहुजन (SC/ST/OBC/RM) समाजाने समाजात जागृती करुन या धोरणा विरोधात आंदोलन उभे करावे असे आवाहन प्रा देविदास घोडेस्वार ह्यांनी केले.

नागपूर विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ भीमराव गोटे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संविधान तज्ञ प्रा देविदास घोडेस्वार, सुप्रसिध्द कवी ज्ञानेश्वर वाकुडकर, भदंत सुंथरो, वंदना संघाचे वासुदेव थुल, महानायक चे मिलिंद फुलझेले, नवयुवक शिक्षण संस्थेचे संकेत डोंगरे ह्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

समीक्षा सभेचे आयोजन वंदना संघ दीक्षाभूमी व बुद्ध विहार समन्वय समितीने दक्षिण नागपूरच्या मानवता हायस्कुल च्या खुल्या पटांगणात केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेवडे ह्यांनी, सूत्रसंचालन डॉ मीना गाढे ह्यांनी, पाहुण्यांचे स्वागत भीमराव गाणार सर ह्यांनी तर समारोप कुमार ह्यांनी केला. या प्रसंगी थायलंड वरुन श्रामनेर ची दीक्षा घेऊन आलेले भन्ते सुंथरो ह्यांचा सन्मान करण्यात आला.


या सभेला दक्षिण नागपुरातील सर्वच स्तरावरील सुज्ञ कार्यकर्ते मनूवादी सरकारचे बहुजनांना बरबाद करणारे जातीयवादी नवीन शैक्षणिक धोरण समजून घेण्यासाठी व या धोरणाचा विरोध करण्यासाठी या समीक्षा सभेला मोठ्या संख्येने उपस्थीत होते.