Published On : Fri, Apr 24th, 2020

नेल्को वर्कर्स बेनिफिट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड नागपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २.५ लक्ष रुपयांची देणगी

Advertisement

नेल्को वर्कर्स बेनिफिट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड नागपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ लक्ष ५० हजार रुपयांचा धनादेश दि. २२ एप्रिल, २०१९ रोजी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक तथा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही मोलाची मदत नेल्को वर्कर्स बेनिफिट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड ने सामाजिक बांधिलकी म्हणून दिली आहे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे डॉ.नितीन राऊत म्हणाले.

नेल्को वर्कर्स बेनिफिट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड चे अध्यक्ष बंडू शंभरकर, सचिव गणेश उमाटे, संचालक आशिष मानकर, त्रिलोचन खरबडे, महिला संचालिका सिंधू वानखेडे व विद्या उईके यांनी धनादेश पालकमंत्र्याकडे सुपूर्द केला.

यावेळी विभागीय जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.