Published On : Wed, Jan 22nd, 2020

मालमता कर वसुलीसाठी नेहरूनगर झोनंतर्गत १६ शिबिरे

Advertisement

नागपूर : नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे आणि कर भरण्यासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने नेहरूनगर झोनंतर्गत वॉर्डावॉर्डात १६ ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. मोठया प्रमाणात लोकांनी या शिबीराचा लाभ घेतला.

नेहरूनगर झोन समितीच्या सभापती समिता चकोले यांच्या मार्गदर्शनात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना दवंडी पिटवून कर भरण्यासाठी आवाहनही करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यासाठी झोन मधील सर्व नगरसेवकांनी नागरिकांना कर भरण्यासाठी उद्युक्त केले. नेहरू नगर झोनच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे यांच्या मार्गदर्शनात कर विभागाच्या अधिकारी विजय मेश्राम, श्री. लांडे यांच्यासह कर्मचाऱ्यानी शिबाराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.