Published On : Tue, May 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नीट पेपरफुटच्या काळ्या जाळ्याचे धागेदोरे नागपुरात? CBI ची नागपूर-चंद्रपुरात धाड!

मोबाईल, लॅपटॉप जप्त, शिक्षण क्षेत्र हादरलं
Advertisement

नागपूर – देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट पेपरफुट प्रकरणाचे धक्कादायक धागेदोरे आता थेट विदर्भात येऊन पोहोचले आहेत. या बहुचर्चित घोटाळ्यात “नागपूर कनेक्शन” समोर आल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी मोठी मोहीम उघडली आहे. सोमवारी दिल्लीहून आलेल्या CBI च्या विशेष पथकाने नागपूर आणि चंद्रपुरात एकाच वेळी धाडसत्र राबवत संशयित विद्यार्थ्यांच्या घरांची झडती घेतली. या कारवाईमुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरातील दोन विद्यार्थ्यांच्या घरांवर पहाटेच CBI चे पथक दाखल झाले. अनेक तास बंद दरवाजाआड चौकशी, मोबाईल डेटा स्कॅनिंग आणि डिजिटल तपास सुरू होता. त्यानंतर तपास पथक थेट चंद्रपुरात पोहोचले, जिथे आणखी एका संशयित उमेदवाराच्या घराची सखोल झडती घेण्यात आली.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईदरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड, चॅट हिस्ट्री आणि अनेक डिजिटल पुरावे तपासण्यात आले. काही महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

तपास यंत्रणांचा मुख्य फोकस आता या विद्यार्थ्यांच्या संपर्क साखळीवर आहे. पेपरफुट रॅकेट, कोचिंग लॉबी, दलाल नेटवर्क किंवा सॉल्वर गँगशी त्यांचे संबंध होते का, याचा कसून तपास सुरू आहे. नागपुरातून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांमुळे तपासाला मोठी दिशा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, परीक्षेपूर्वी झालेल्या काही संशयास्पद चॅट्स, पैशांचे व्यवहार आणि गुप्त संपर्कांमुळे CBI चा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे नागपुरातून जप्त करण्यात आलेले डिजिटल पुरावे दिल्लीला पाठवण्यात आले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह जवळच्या व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी तपासाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.

नागपूरचे नाव यापूर्वीही वैद्यकीय प्रवेश परीक्षा घोटाळ्यांत समोर आले आहे. 2015 च्या AIPMT घोटाळ्यापासून ते 2021 च्या नीट फर्जीवाड्यापर्यंत अनेक प्रकरणांत विदर्भातील नेटवर्क चर्चेत राहिले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा “शिक्षण माफिया”चा सावट नागपुरावर तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से हमला! #NagpurNews #Crime #CrimeNews #news

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda #NagpurCrime

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges