मुंबई: NEET ची परिक्षा देणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. नीटसाठी देशभरात २३ नवी केंद्र सुरू केली आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. यानुसार राज्यात चार नव्या केंद्रांची भर पडली आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्हांमध्ये अतिरिक्त केंद्र सुरु करण्यात आली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. नीटसाठी राज्यात आतापर्यंत नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी केवळ सहाच केंद्र होती. आता त्यात चार अतिरिक्त केंद्रांची भर पडल्याने ही संख्या 10 वर पोहोचली आहे.
#NEET 2017 will be conducted from 23 new cities in the country @JPNadda #CBSE pic.twitter.com/hTsdmobfW0
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 24, 2017
परंतु मराठवाड्यात एकही नवीन केंद्र मिळालेलं नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी औरंगाबाद हे एकमेव केंद्र आहे. यापूर्वी नीट परीक्षा 80 शहरांमध्ये घेतली जात असे. पण आता 23 नव्या केंद्रामुळे 2017 ची नीट परीक्षा 103 शहरांमध्ये होणार आहे.
Earlier #NEET was conducted from 80 cities and with 23 new cities, #NEET 2017 will now be conducted from 103 cities @JPNadda #CBSE (2/3)
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 24, 2017
या शहरात नीटचे नवी केंद्र
आंध्र प्रदेश – गुंटूर
आंध्र प्रदेश – तिरुपती
गुजरात – आणंद
गुजरात – भावनगर
गुजरात – गांधीनगर
कर्नाटक – दावणगिरी
कर्नाटक – हुबळी
कर्नाटक – म्हैसूर
कर्नाटक – उडपी
केरळ – कन्नूर
केरळ – थ्रिसूर
महाराष्ट्र – अहमदनगर
महाराष्ट्र – अमरावती
महाराष्ट्र – कोल्हापूर
महाराष्ट्र – सातारा
पंजाब – अमृतसर
राजस्थान – जोधपूर
तामिळनाडू – नमक्कल
तामिळनाडू – तिरुनेलवेली
तामिळनाडू – वेल्लोर
उत्तर प्रदेश – गोरखपूर
पश्चिम बंगाल – हावडा
पश्चिम बंगाल – खरगपूर
