Published On : Tue, Sep 8th, 2020

घरकुलाचा लाभ गरजू कुटुंबास मिळावा: माजी उपसरपंच देवा मेहरकुळे यांची मागणी

रामटेक– समाजातील विविध वर्गासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असून त्या गरजू व्यक्ती आणि कुटुंबापर्यंत पोचली पाहिजे.विमुक्त भटक्या,भटक्या जमातीसाठी (NT-B)या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्याचे शासन स्तरावर ठरले असून त्या घरकुलाचा लाभ कोणताही भेदभाव न करता योग्य व गरजू व्यक्तीस मिळावा

यासाठी आणि या योजनेची योग्य तसेच तातडीने अंमलबजावणी केली जावी यासाठी ग्रामपंचायत सोनेघाटचे माजी उपसरपंच देवा मेहरकुळे यांनी सचिव कीर्ती बोंद्रे यांना दिले निवेदन देतेवेळी भारत मोबिया गणेश बावनकुळे धीरज मेहरकुळे व सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement