Published On : Wed, Apr 14th, 2021

बाबासाहेबांच्या विचारांपासून धडा घेण्याची गरज : ऍड. धर्मपाल मेश्राम

Advertisement

बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

नागपूर : कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वैश्विक महामारीच्या प्रसंगावर बाबासाहेबांच्या विचारांची आज प्रसंगीकता आणि त्यापासून धडा घेण्याची आवश्यकता याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले, सार्वजनिक आरोग्यासाठी सरकारच्या भूमिकेविषयी बाबासाहेबांची कल्पना वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्माण करण्यापासून किंवा विशिष्ट आजारांविरूद्ध विशिष्ट वैद्यकीय हस्तक्षेपाची बाजू घेण्यापलीकडे आहे. वैश्विक महामारीच्या प्रसंगी प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहेच मात्र याशिवाय प्रत्येकाला पौष्टिक भोजन, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे आणि प्रत्येकाचे उत्पन्न स्थिर राहील याची काळजी घेण्याची सुध्दा जबाबदारी सरकारची आहे. नागरिकांना उपचार देताना जातीच्या आधारे सेवा देणे ही चुकीची बाब आहे. सर्वांना समानतेने प्राधान्याने योग्य उपचार मिळावे ही सरकारची नैतीक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

बाबासाहेबांच्या या विचारांना आज कृतीत उतरवण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा अभ्यास करून त्यावर अंमलबजावणी केल्यास आजच्या कठीण प्रसंगातूनही मार्ग निघेल, असा विश्वास ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.