Published On : Wed, Nov 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पहाटे चार तास NDPS पथकाची कारवाई; MD ड्रग्जसह तीन तस्करांना अटक

Advertisement

नागपुर में तड़के 4 घंटे चला NDPS ऑपरेशन, MD ड्रग्स के साथ 3 तस्कर गिरफ्तार

नागपूर -शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या NDPS पथकाने मोठी कारवाई केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे सुमारे चार तास चाललेल्या या कारवाईत MD ड्रग्जची विक्री करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २१ ग्रॅम MD पावडर, तीन मोबाईल फोन आणि एक मोपेड असा एकूण ३ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यू नंदनवन परिसरातील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. परिसरात MD ड्रग्जची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती NDPS पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या २१ ग्रॅम MD पावडरची किंमत ६३ हजार ६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईत हसनबाग येथील २१ वर्षीय शेख समीर शेख शब्बीर, टिमकी येथील २१ वर्षीय शेख माज अब्दुल सत्तार आणि नंदनवनमधील वृंदावन नगर येथील १९ वर्षीय इशांत नबी शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हसनबाग येथील २४ वर्षीय शहानवाज शब्बीर शेख आणि सुमारे ५० वर्षीय कमरुनिसा अंसारी यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.