Published On : Wed, Sep 25th, 2019

राष्ट्रवादी युवकांचा मुंबई ईडी कार्यालयावर हल्लाबोल;युवकांवर पोलिसांचा लाठीचार्ज…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचेच पडसाद आज उमटले. युवक काँग्रेसच्यावतीने ईडीच्या मुंबई कार्यालयावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनाची भनक नसलेल्या पोलिसांकडून युवकांना पांगविण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख आणि युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलन करणार्‍या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान शरद पवार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हयामुळे युवकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचेच पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळत आहे.