Published On : Thu, Nov 15th, 2018

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील १७ नोव्हेंबरला अकोला दौऱ्यावर

MLA Jayant Patil

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील १७ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये अकोला जिल्हा,ग्रामीण आणि तालुका कार्यकारिणी आढावा बैठका व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा घेणार आहेत.

१७ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता अकोला येथील कै.डॉ.कुसुमताई वामनराव कोरपे यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी अकोला शहर जिल्हा, ग्रामीण व तालुका कार्यकारिणीच्या आढावा बैठका लागोपाठ होणार आहेत.

दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आणि त्यांनतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा मराठा मंडळ स्टेशनरोड अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. शिवाय सायंकाळी ६ ते ८ वाजता अकोला जिल्हयातील विधीतज्ज्ञ, व्यापारी, डॉक्टर्स, व्यावसायिक यांच्याशी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील संवाद साधणार आहेत अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.