Published On : Thu, Nov 15th, 2018

म.न.पा.त क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती संपन्न

महापौर, उपमहापौर व्दारा विनम्र अभिवादन

नागपूर: थोर क्रांतीकारक व आदिवासी समाजसुधारक ‍बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आज दि. १५ नोव्हेंबर, २०१८ राजी महापौर श्रीमती नंदा जिचकार, उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर व श्रीमती मायाताई इवनाते यांनी म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील शहीद बिरसा मुंडा यांच्या पुर्णकृती तैलचित्राला म.न.पा.तर्फे माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी धरमपेठ झोन सभापती श्री. प्रमोद कौरती, माजी नगरसेवक श्री. मनोज साबळे, श्री.किशोर जिचकार, श्री.अमित कोवे, निगम सचिव श्री. हरिष दुबे, सहा. आयुक्त (सा.प्र.वि.) श्री. महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी श्री. अशोक कोल्हटकर, कामगार नेते श्री. राजेश हाथीबेड, श्रीकृष्ण कल्चरल फाऊंडेशनच्या प्रमिला उन्नीकृष्णन, दिलीप तांदळे, राजू भंडारकर, नरेश खरे, हिरालाल कोवे, विलास धुर्वे, ‍चिंधु कावळे, संपत सायरे, निलेश भनारकर, मनोज कुमार अरगुलवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.