नागपूर : दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले होते. यामुळे राजकीय वातवरण चांगलेच तापले असून याचा निषेध करण्यासाठी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामध्ये ईश्वर बाळबुद्धे, अविनाश काकडे, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंह, शिव बेंडे, महेंद्र भांगे, सुखदेव वंजारी, रिजवान अंसारी,राजा बेग, अरविंद भाजीपाले आदी सहभागी झाले होते. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने कॉटन मार्केट चौकातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केेली. तसेच शिंदे -फडणवीस सरकारच्या कृतीचा कडाडून निषेध केला.