मुंबई: – राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे व पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
आज राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
Advertisement

Advertisement
Advertisement